Sat, Jan 19, 2019 02:12होमपेज › Pune › अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिला ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिला ठार

Published On: Jul 04 2018 10:17AM | Last Updated: Jul 04 2018 10:17AMपिंपरी : प्रतिनधी 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहूकडे निघालेल्या दोन वारकरी महिलांचा अज्ञात वाहनाने धडकेत मृत्यू झाला. ही घटना पहाटे मोशी येथे घडली. जनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०, दोघी रा. अंबाजोगाई, जि. बीड) अशी वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या वारकरी महिलांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून दिंडी देहूकडे येत होती. याच दिंडीत जनाबाई आणि सुमनबाई आल्या होत्या. मोशीतील बो-हाडेवस्ती येथे मंगळवारी (दि. ३) रात्री दिंडी मुक्कामाला थांबली होती. पहाटे जनाबाई आणि सुमनबाई प्रातविधीसाठी जात असताना हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत तपास करीत आहे.वारकरी महिलांच्या या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.