होमपेज › Pune › दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ची अ‍ॅलर्जी

दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ची अ‍ॅलर्जी

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:43AMपिंपरी : प्रतिनिधी

दरवर्षी अनेक नागरीक रस्ते अपघातात प्राण गमावतात. त्यात दुचाकीस्वारांच्या अपघातांत मरण पावणार्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळं हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र तरुणाईला तसेच नागरीकांना हे हेल्मेट आता नकोसे झाले आहे. तसेच वाहतुक पोलिसांकरवी याबाबत कारवाई थंडावली आहे. त्यामुळे शहरात आता हेल्मेटऐवजी स्कार्फचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. 
पूर्वी शहरात केवळ मुलींच चेहर्‍यावर स्कार्फ बांधून दुचाकी चालवत असत, परंतू मुलींपाठोपाठ हेल्मेट असूनही मुलांनी आता बिनधास्त स्कार्फ तसेच मास्क लावणे सुरु केले असून हेल्मेट सक्तीचा बोर्‍या वाजला आहे.

वाहतुक पोलिसांकडूनही याबाबत जाणूनबूजून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे तरुणांचे स्कार्फ बांधून वेडीवाकडी बाईक चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुक नियमांनुसार दुचाकी चालवतांना हेल्मेट बंधनकारक असतांना तरुणाई मात्र हेल्मेट न घालण्यासाठी हजारो कारणे देत आहेत. हेल्मेटऐवजी स्कार्फने पूर्ण चेहरा झाकला जातो. त्यामुळे दुचाकीवर मुले मुली बेदरकारपणे वेडीवाकडी बाईक चालवून इतरांना संकटात टाकत आहे. स्कार्फमुळे दुचाकीस्वार ओळखू येत नाही. त्यामुळे तरुण मुले मुलींचे विचित्र प्रकार नजरेस पडत असून यामुळे इतर नागरीकांना मनस्ताप होत आहे. अशा तरुणांंवर कारवाई करावी  तसेच हेल्मेट सक्ती करावी अशी मागणी नागरीकांनी  केली आहे.