होमपेज › Pune › पुणे : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार

पुणे : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार

Published On: May 20 2018 10:21PM | Last Updated: May 20 2018 10:21PMओतूर: वार्ताहर

दिवसेंदिवस कल्याण नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून मढ, उदापूर, ओतूर, पिंपरी पेंढार या सुमारे वीस किलोमीटरच्या परिसरात चोवीस तासात चार अपघात झाले आहेत. या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरू असल्याची बाब गंभीर असून जि .प.सदस्य अंकुश आमले यांनी आवश्यक त्या ठिकाणी रबरी गतिरोधक टाकण्याची लेखी मागणी संबधित रस्ते बांधकाम विभागाकडे केली आहे. त्याची योग्य ती दखल घेतली जात नसल्याने सर्व गावामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान ता.२० मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  कोळवाडी (ता.जुन्नर )फाट्या जवळ झालेल्या महिंद्रा कॅटो ( एम.एच.१६.ए. टी.४५२७) व स्विफ़्ट (एम.एच.४६.ए.पी.८२५७)च्या भीषण धडकेत दोनजन जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे अंमलदार माळी यांनी दिली.

या अपघातात अरविंद सुधाकर चौधरी ( वय ३३), रा. खारघर, मुबंई व सुशांत शहाजी देशमुख ( वय २०) रा.फांगणे, पो.मोरोशी, ता.मुरबाड जि. ठाणे असे ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. संताजी शिवाजी देशमुख, रोशन जगन्नाथ चौधरी, प्रकाश संभाजी देशमुख सर्व रा.तळेगाव, ता.मुरबाड व मुंजा बापू कदम (वय ३२)रा.काळकूप, ता. पारनेर जि नगर अशी जखमींची नावे आहेत .
गेल्या २४ तासात पिंपरी पेंढार, उदापूर, ओतूर ( कोलमाथा ) व कोळवाडी  येथे असे एकूण चार अपघात घडल्याने  हा महामार्ग  अंत्यत घातक ठरला असल्याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.