Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Pune › मामाच्या गावी निघालेल्या मुलाचा मृत्यू

मामाच्या गावी निघालेल्या मुलाचा मृत्यू

Published On: Apr 25 2018 3:03PM | Last Updated: Apr 25 2018 3:03PMपिंपरीः प्रतिनिधी

एक्सप्रेस रेल्वेने मामाच्या गावी निघालेल्या तेरा वर्षाच्या मुलाचा रेल्वेतून खाली पडून दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात चिंचवड रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी घडला.

अर्जुन कृष्णा रामेशराव (वय १३, रा. डोबिंवली वेस्ट, मुंबई) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन हा मुंबईचा असून तो त्याच्या मामाकडे सोलापूरला निघाला होता. एक्सप्रेस रेल्वेने तो मामासोबत मुंबईहून सोलापूरला बुधवारी सकाळी निघाला होता. पुणे, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर त्याचा रेल्वेच्या दारातून तोल गेल्याने तो खाली पडला. यामध्ये त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत.

दुसरी घटना बुधवारी सकाळी पिंपरी रेल्वे स्थानकावर घडली. अंदाजे ४५ वर्षीय पुरुष लोहमार्ग ओलांडत असताना रेल्वे गाडीची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. यांची ओळख अद्याप पटलेली नसून लोहमार्ग पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला आहे.

Tags : accident, railway line, pimpari chinchavad, pune news