Tue, Mar 26, 2019 12:11होमपेज › Pune › घरफोडून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले

घरफोडून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले

Published On: Jan 29 2018 10:01AM | Last Updated: Jan 29 2018 10:01AMपुणे : प्रतिनिधी

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना स्वारगेट परिसरात मध्यरात्री घर फोडून लाखो रुपयांचा माल घेऊन जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गस्तीवरील पथकाने रंगेहात जिन्यावरच पकडले. मात्र, चोरट्यानी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चक्क स्वहतावर ब्लेडने वार करून घेतल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली. 

पवित्रसिंग टाक आणि सन्नीसिंग दुधानी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगाराची नावे आहेत. नव्या वर्षाची सुरवातच शहरात घरफोड्या आणि सोन साखळीच्या घटनांनी झाली. त्यामुळे शहरात पेट्रोलिंग आणि गस्त वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, स्वारगेट पोलिस मध्यरात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी उपनिरीक्षक साबळे आणि त्यांच्या पथकाला एका सोसायटीतून दोघे हातात काही वस्तू घेऊन घाईत उतरत असल्याचे दिसले. त्यावेळी पथकाने याठिकाणी घाव घेऊन दोन सराईत चोरट्यावर झडप घालत दोघांनाही पकडले. त्यावेळी दोघे घरफोडून माल घेऊन पसार होत असल्याचे समजले. त्याच वेळी चोरट्यांनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी ब्लेडने स्वत:च्या अंगावर वार करून घेतले.