Fri, Nov 16, 2018 04:29होमपेज › Pune › यवतजवळ शिवशाहीचा टायर फुटला 

यवतजवळ शिवशाहीचा टायर फुटला 

Published On: May 12 2018 7:32PM | Last Updated: May 12 2018 7:32PMपुणे : प्रतिनिधी 

पुणे -सोलापूर महामार्गावर यवतजवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वातानुकूलित शिवशाही बसचा टायर फुटल्याची घटना शनिवारी (दि. १२) घडली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तुळजापूरहून पुण्याला येणारी शिवशाही बस (क्रमांक एमएच ०९ इएम १२७०)  यवतजवळ आली असता अचानक तिचा टायर फुटला. चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने प्रसंगावधान राखत बस पूर्णपणे नियंत्रणात आणल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली  नाही.  

घटनेनंतर शिवशाहीमधील प्रवाशांना दुसर्‍या शिवशाही बसने पुण्याला पाठवण्यात आले. गाडीत एकूण ४५ प्रवासी होते.  

दरम्यान, शिवशाही बसचे राज्यभरात गेल्या महिनाभरात चार अपघात झाले असून एसटीसाठी देखील ही गोष्ट डोकेदुखीची व चिंतेची ठरत आहे. सर्व शिवशाही बसची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.