Wed, Nov 21, 2018 19:40होमपेज › Pune › श्रीक्षेत्र तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा

श्रीक्षेत्र तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा

Published On: Jan 16 2018 11:20AM | Last Updated: Jan 16 2018 11:20AM

बुकमार्क करा
कोरेगाव भीमा : वार्ताहर

छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ श्रीक्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची शानदार सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे पूजन हवेली तालुक्याचे तहसीलदार  पिसाळ, सरपंच गणेश पुजारी आणि  ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. 

यावेळी प्रेरणा मंत्राचा घोष करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीला पारंपरिक वाद्यांच्या गजरात सुरूवात झली. यावेळी हजारो नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी होते. विविध आरोग्यसेवा व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.