Sun, Jul 21, 2019 08:08होमपेज › Pune › पुणे : तुकाराम मुंढेंना एवढा राग का आला? (Video)

पुणे : तुकाराम मुंढेंना एवढा राग का आला? (Video)

Published On: Jan 09 2018 6:56PM | Last Updated: Jan 09 2018 6:56PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडलाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची हेकेखोर, हुकुमी, आक्रस्ताळी आरडाओरड एका व्हिडीओतून समोर आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून मुंढे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पीएमपीने कर्मचारी भरती संदर्भात यादी प्रसिद्ध केल्याचे समजते. पण, त्यात पूर्वीपासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलण्यात आल्याने ते कर्मचारी पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयाबाहेर जमले होते. त्या वेळी तेथे येऊन मुंढे यांनी या कामगारांना अत्यंत अपमानस्पद वागणूक दिल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे.

या व्हिडिओतील संभाषण असे
 

मुंढे : काय प्रॉब्लम आहे?
कामगार : नावे आली नाहीत
मुंढे : हॅ!
कामगार : नावे आली नाहीत
मुंढे : कायम स्वरूपी ब्लॅक लिस्ट करून टाकीन. समजलं का? लवकर लागायले म्हणून काय जास्त नाटकं करायला लागले काय? दोन मिनिटात निघायचं, नाहीतर अरेस्ट (अटक) करत असतो. जा पळा, चला...काय समजता काय?