Fri, Feb 22, 2019 12:34होमपेज › Pune › ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला कंटेनर

ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला कंटेनर

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 12:49AMपिंपरी ः प्रतिनिधी

पुणे-मुंबई महामार्गावर महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्याबाई होळकर चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कंटेनर अडकला. यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला.पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. 

मुंबईहून पुण्याकडे चारचाकी वाहने घेऊन जाणारा कंटेनर (एनएल 01 एए 9783) पिंपरीमधील अहिल्याबाई होळकर चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला. कंटेनर ग्रेडसेपरेटरच्या छताला घासला गेल्याने छताचे टवके निघाले. यामुळे कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंटेनर अडकल्यामुळे ग्रेडसेपरेटरमधून जाणारा रस्ता सेंट्रल मॉलसमोरून बंद करण्यात आला. 

मुंबई-पुणे महामार्गावरील सर्व वाहतूक एकेरी मार्गावरून वळविण्यात आली. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, वाहनचालकांच्या निष्काळजीपणाबरोबर  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडतात. त्यामध्ये ग्रेडसेपरेटरचे वारंवार नुकसान होते. ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर प्रवेश करतातच कसे? असा प्रश्न नागरिक करत आहेत.