Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Pune › वाहतूक पोलिसाला नडला, गाडीसहित टॅम्पोत चढविला(व्हिडिओ)

वाहतूक पोलिसाला नडला, गाडीसहित टॅम्पोत चढविला(व्हिडिओ)

Published On: May 31 2018 11:09PM | Last Updated: May 31 2018 11:09PMपुणे : नवनाथ शिंदे

शहरात कोण काय करेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. मग त्यात मागे राहतील ते वाहतूक पोलिस कसले. त्याचे झाले असे की, नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी गाडी उचलताना टोईंग कर्मचार्‍यांना एका दुचाकी चालकाने अडविण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या टोईंग कर्मचार्‍यांनी चालकालाच चक्क दुचाकीसह टॅम्पोत चढविण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.३०) विमाननगर परिसरात तवा स्ट्रिट हॉटेलसमोर लुंकड प्लाझासमोर घडला आहे. 

विमाननगर परिसरात एक दुचाकीचालक नो पार्किंगमध्ये उभा होता. त्यावेळी येरवडा वाहतूक विभागाच्यावतीने दुचाकी चालकाची गाडी नो पार्किंगमध्ये असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. त्यासाठी टोईंग कर्मचार्‍यांनी दुचाकी गाडी टेम्पोत नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, दुचाकीचालक पठ्ठा गाडीवरून खाली उतरायलाच तयार नव्हता. मग काय टोईंग करणार्‍या कर्मचार्‍यांनी दुचाकी चालकासहित गाडीला टॅम्पोत चढविले.

दरम्यान परिसरातील वाटसरुने या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला आहे. त्यामुळे भावा पुण्यात यापूर्वी नो पार्किंगचा दंड वसूल केला जात होता. पण आता पैसे नसले तरी चालतील तुझ्यासहित गाडी टॅम्पोत चढविण्यात येईल अशा चर्चेमुळे आणि व्हिडिओमुळे पुन्हा एकदा पुणेरीपणा आढळून आला आहे.

यासंदर्भात वाहतूक पोलिस विभागाशी संपर्क साधला असता विमाननगर वाहतूक विभागातील संबधित कर्मचारी सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.