Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Pune › पुणे : महाविद्यालयाजवळ जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक

पुणे : महाविद्यालयाजवळ जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक

Published On: Aug 27 2018 10:22AM | Last Updated: Aug 27 2018 10:22AMपिंपरी : प्रतिनिधी

चिंचवड येथील महाविद्यालयालगत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळत असलेल्या तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. रविवारी ( दि.२६ ) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. राहुल माने (वय २६), लाला शिंदे (वय ३४), राहुल पवार (२७, सर्व रा. चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे एका महाविद्यालालगत असलेल्या मोकळ्या जागेत काहीजण जुगार खेळत खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता तिघेजण पैशावर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते आणि तेराशे रुपये हस्तगत केले आहेत. उपनिरीक्षक विठ्ठल बडे पुढील तपास करीत आहेत.