Sun, Aug 18, 2019 21:05होमपेज › Pune › बाललैंगिक अत्याचाराच्या तीन घटनांमध्ये तिघांना कोठडी

बाललैंगिक अत्याचाराच्या तीन घटनांमध्ये तिघांना कोठडी

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी 

बिबवेवाडी, चिखली तसेच आकुर्डी येथील वेगवेगळ्या तीन घटनांत मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या तीन प्रकरणात तिघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दळण आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रशांत विक्रम वाघमारे (वय 26, रा. भीमशक्तीनगर, चिखली) याला निगडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. 

12 मार्च 2018 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली, तर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सुग्रीव हंसराज चौधरी (वय 30, रा. सटाव, ता. बराव, उत्तर प्रदेश) याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.  या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली. 
23 फेेब्रुुवारी 2018 रोजी ही घटना घडली. तिसर्‍या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या एकाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अक्षय रमेश म्हसुडगे (21, रा. साईनगर, देहूरोड) याला अटक केली. त्याला 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

गुहुंजे येथील चौकातून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ती मुलगी आणि अक्षय हे दोघे पुरंदर येथे सापडले होते. 9 मार्च रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. 
तिन्ही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.