Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Pune › तिहेरी खूनप्रकरणात एकाला अटक

तिहेरी खूनप्रकरणात एकाला अटक

Published On: Feb 24 2018 8:22AM | Last Updated: Feb 24 2018 8:22AMपुणे : प्रतिनिधी

मध्यवस्ती भागातील नागझरी नाल्यात सापडलेल्या तीन मृतदेहांचे गुढ उकलले असून कचरा गोळा करण्यावरून हे तिहेरी हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक तर एकाला ताब्यात घेतले. दरम्यान दोन मृतदेहांची ओळख पटली असून  खुनामध्ये एका 13 वर्षाच्या मुलासह दोन तरूणाचा समावेश आहे. 

विक्रम उर्फ विकी दिपसिंग परदेशी (34, रा. परदेशीवाडा, नाडे गल्ली, पुणे) याला फरासखाना पोलिसांनी अटक करून फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तर नावेद रफीक शेख (वय 15,रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) आणि संदिप अवसरे (वय 32) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दोघांची नावे आहेत. तिसर्‍याची ओळख पटलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी  मृतदेह सापडल्यानंतर  प्रभारी पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांच्यासह गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.  

त्यानंतर ओळख पटविण्याचे काम सुरू होते. रात्री उशीरा यातील अल्पवयीन मुलाची ओळख पटली. तर, इतर दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. शनिवारी दुसर्‍याची ओळख पटविण्यात आली आहे. मात्र, तिसर्‍याची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान यातील संदीप अवसरे याच्या नातेवाईकांबाबत पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही. येथील नागरिकांकडून त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. गून्हे शाखेचे उपायुक्क्त पंकज डहाणे,  युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक दिनेश कदम, फरासखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेेंद्र जाधव व पथकाने मध्यरात्री याप्रकरणात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्यांचा आणखी साथीदार असल्याचे समोर आले आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

त्यानुसार, पोलिसांनी विक्रम उर्फ विक्क्की याला अटक केली आहे. तर, दुसर्‍याकडे शोध चौकशी सुरू आहे. मृतावस्थेत सापडलेले तिघेजण आणि आरोपी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली. आरोपी आणि मृतावस्थेत सापडलेल्या तिघांचा कचरा वेचण्याच्या कारणावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपींनी तिघांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचा संशय  आहे.