Tue, Mar 26, 2019 01:37होमपेज › Pune › पुणे : हजार कोटी मिळूनही मुळा-मुठा अस्वच्छच

पुणे : हजार कोटी मिळूनही मुळा-मुठा अस्वच्छच

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 2:09AMपुणे ः देवेंद्र जैन

केंद्र सरकारने नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मुळा-मुठा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी हजार कोटींच्या निधीची तरतूद केली होती. तो निधी पालिकेलाही मिळाला होता. परंतु, दोन वषार्र्ंनंतरही नदी स्वच्छतेचा कोणताही कार्यक्रम करण्यात आला नाही. किंबहूना आखणी देखील झाली नाही. उलट दिवसेंदिवस नदीच्या प्रदूषणात वाढच होत चालली आहे. त्यामुळे पालिकेला मिळालेले हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्‍न पुणेकरांना पडला आहे. 

नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राने नदी संवर्धन योजनेंतर्गत नद्यांच्या स्वच्छतेसाठी 20 हजार कोटींची तरतूद केली होती.