Fri, Sep 21, 2018 23:47होमपेज › Pune › पुणे :  यावर्षीपासून  'निर्मल वारी, हरित वारी अभियान' (video)

पुणे :  यावर्षीपासून  'निर्मल वारी, हरित वारी अभियान' (video)

Published On: Jul 02 2018 4:20PM | Last Updated: Jul 02 2018 4:20PMपुणे : प्रतिनिधी

 श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती पंढरपूरतर्फे यावर्षीपासून पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यासाठी 'निर्मल वारी, हरित वारी अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती समिती सदस्य ह. ब. प. शिवाजी मोरे, ऍड. माधवी निगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

हा उपक्रम राबविण्‍यापाठीमागे एकच हेतू आहे की, लोकांना पर्यावरणाचे महत्‍त्‍व लक्षात यावे. सध्‍या पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. त्‍यासाठी महाराष्‍ट्रात प्‍लास्‍टिक बंदी यासारखे पर्यावरण पूरक रबविण्‍यावर भर देत आहे. सहभागी होणाऱ्या दिंड्यासाठी 'निर्मल वारी, हरित वारी अभियान' राबविण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिंडीला अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे एक लाख, ७५ हजार आणि ५० रुपयाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.