Fri, Apr 26, 2019 16:17होमपेज › Pune › यंदाच्या गणेश उत्सवात ‘चायनिज माल चले जाव’ (Video)

यंदाच्या गणेश उत्सवात ‘चायनिज माल चले जाव’ (Video)

Published On: Sep 10 2018 5:48PM | Last Updated: Sep 10 2018 6:10PMपुणे : ज्योती बनकर 

सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून जोरदार विरोध झाल्यानंतर चायना  मालाला ‘चले जाओ’ म्हटल्याने यंदाच्या गणेशात्सवात लाइटिंगच्या स्थानिक माळांचा झगमगाट दिसणार आहे. मुंबइतील होलसेल आणि पुण्यातील व्यापर्‍यांनी चायनामाल नाकारला असून बाजारात ‘इंडियन’ लाईटिंगचे एकसे बढकर एक प्रकार उपलब्ध आहेत. 

इतके वर्ष सर्वांनाच लाईटिंगसाठी सरसकट चायनिज मालावर अवलंबून रहाण्याची सवय लागली होती. कारण एकच, स्वस्तातला माल आणि तोही आकर्षक मिळत असे. मग भले एकदा वापरा आणि फेकून पुढच्या वर्षी नविन आणा. मात्र यावर्षी सर्वत्रच चायनिज मालावर  बहिष्कार घातलेला दिसून येत आहे. कारण यावर्षी ‘इंडियन माल’ महाग आणि फार आकर्षकही नसतो या समजुतीला खोटे ठरवत आकर्षक, किंमतीला परवडतील असे विविध प्रकार  व्यापार्‍यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन व्हायला आता काही दिवसच उरले असताना बाप्पाचे आगमन  इंडियन रोषणाईत होणार आहे. मार्केटमधे रोषणाईसाठी काय काय पर्याय आहेत त्याचा हा व्हिडिओ.