Tue, Nov 20, 2018 23:04होमपेज › Pune › पुण्यात सराफावर हल्ला करत ज्वेलरी शॉपवर डल्ला

पुण्यात सराफावर हल्ला करत ज्वेलरी शॉपवर डल्ला

Published On: Feb 11 2018 8:46AM | Last Updated: Feb 11 2018 8:46AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील मध्यवस्ती असणाऱ्या  रविवार पेठ भागातील सराफ व्यावसायिकाला  हात-पाय बांधून दुकानात डांबून ठेवत सोन्याचे दागीने आणि रोकड पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अबुरा यांनी फिर्याद दिली आहे. अबुरा यांचे रविवार पेठेत सोने कारागिरीचे दुकान आहे. ते रात्री 12 वाजता दुकानातील काम संपवून दुकान बंद करत होते. त्यावेळी तिघांनी त्यांना मारहाण केली. त्यांनतर त्यांचे हात-पाय बांधून त्यांना दुकानात डांबले. तसेच दुकानातील रोकड आणि सोने चोरून नेले.