Tue, Nov 20, 2018 01:27होमपेज › Pune › ...तर आयुक्तांच्या बंगल्यात कुत्रे सोडू 

...तर आयुक्तांच्या बंगल्यात कुत्रे सोडू 

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 11 2018 11:17PMपिंपरी :  शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून त्याचा बंदोबस्त करा,  अन्यथा आयुक्तांच्या बंगल्यात कुत्रे सोडू असा इशारा,  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात उबाळे यांनी म्हटले आहे की, यमुनानगर सेक्टर 21 प्रभाग क्रमांक 13 येथील करसंकलन केंद्रा जवळील प्लॉट नं. 264  येथे सुमारे 10 ते 12 मोकाट कुत्री बसलेली असतात. ती रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांवर हल्ला करत आहेत दिनांक 10 मे रोजी  रंजना शामराव गोलांडे यांच्यावर या कुत्र्याच्या टोळीने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. संपूर्ण यमुनानगर भागातील जनता यामुळे घाबरून गेली आहे, त्रस्त झाली आहे. आपण लक्ष घालून मोकाट कुत्र्यांना पकडून नागरिकांना दिलासा द्यावा; अन्यथा ही मोकाट कुत्री आयुक्तांच्या बंगल्यात सोडण्यात येतील असा इशारा उबाळे यांनी दिला आहे.