होमपेज › Pune › चिंचवडगाव येथे चोरट्यांनी दोन दुकाने फोडली  

चिंचवडगाव येथे चोरट्यांनी दोन दुकाने फोडली  

Published On: Apr 24 2018 12:30PM | Last Updated: Apr 24 2018 12:30PMपिंपरी : प्रतिनिधी 

चिंचवड येथे सोमवारी मध्यरात्री मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या दुकानातून रोख रक्‍कम आणि काही वस्‍तू लंपास केल्‍या आहेत. 

चिंचवडगाव येथील चापेकर चौक ते जुना जकात नाका या दरम्यानच्या रस्त्यावरील गिफ्ट गॅलरी आणि हिमगिरी प्लायवूड ही दोन दुकाने चोरट्यांनी फोडली असून, सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दुकानांचे शटर उचकटून आतील काही रक्कम चोरीस गेल्याचे समजते. मात्र, याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Tags : pimpri chinchwad city, theft, shop