Sun, Sep 23, 2018 04:03होमपेज › Pune › पिंपरीत ट्रकचालकाला मारहाण करून लुटले

पिंपरीत ट्रकचालकाला मारहाण करून लुटले

Published On: Jul 11 2018 11:54AM | Last Updated: Jul 11 2018 11:54AMपिंपरी : प्रतिनिधी

ट्रकचालकाला हाताने व पट्ट्याने मारहाण करून त्याच्या खिशातील रोकड काढून घेतली. हा प्रकार काल मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपरीतील महापालिकेच्या समोर घडला. याबाबत सुलतान खान (३१,रा.बसवकल्याण, कर्नाटक ) या चालकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा नोंद केला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुलतान खान मुंबईच्या दिशेने जात असताना. महापालिकेसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा ट्रक अडवला. खान यांना हाताने व कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत