Thu, Jul 18, 2019 16:58होमपेज › Pune › अनधिकृत पार्किंगमुळे कोंडीत भर भवानी पेठ येथील स्थिती

अनधिकृत पार्किंगमुळे कोंडीत भर भवानी पेठ येथील स्थिती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भवानीपेठ : वार्ताहर

पुणे स्मार्ट सिटी होण्याकरीता अनेक गोष्टींची गरज आहे. पेठांतील अरूंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा गेल्या अनेक वर्षापासून तब्बल 300 ते 350 बेवारस वाहने रस्त्यावर धूळखात पडलेली असल्याची तक्रार शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी केली आहे. या परिसरात क्वार्टर गेट चौक, कादर चौक, साचापीर स्ट्रीट, अल्पना टॉकीज, पद्ममजी पोलीस चौकी, महात्माफुले हायस्कूल, दुल्हा दुल्हन कब्रस्थान, चुडामन तालीम अशा नानापेठ व भवानीपेठ परिसरातील वाहनांची कायमस्वरूपी दुतर्फा पार्किंग असते. शहराच्या मध्यवर्ती भागातील क्वार्टरगेट हा मुख्य चौक असल्याने याचौकातून लक्ष्मीरोड, पुणे स्टेशन, कॅम्प व भवानीपेठ चारही यामार्गांना छेद देतो.

त्यामुळे बेकायदेशीर पार्किंग केलेल्या यावाहनांमुळे वाहतुकीची कोंडीची सुरूवात याच परिसरातून होते. तसेच परिसरात मराठी, हिंदी, उर्दु व इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालय आहे. त्यामुळे याशाळा व महाविद्यालय सुटल्यावर यासमस्येमुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीनच भर पडते. काही वाहने चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. व त्याबाबत पोलीस खात्याचे रहदारी विभाग कोणत्याही स्वरूपाची सतत्या पडताळून पाहत नाही. शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट चौकापासून मोठ्या प्रमाणात उत्तम केटर्रसची तब्बल 25 ते 30 छोटी मोठी व जड वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याची नजरेस येतात. यापरिसरात 100 मीटरच्या अंतरावरच समर्थ पोलीस स्टेशन आहे. तरीही पोलीसाकडून डोळे झाक करण्याचे कारण काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

यासंबंधित समर्थ पोलीस स्टेशन वाहतूक विभागाशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पुणे शहराचा विस्तार लक्षात घेता संपूर्ण शहरात फक्त पाचच क्रेन उपलब्ध आहे. जुनी वाहने उचलण्याकरिता अनेक महिने आम्हाला क्रेनची प्रतिक्षा करावी लागते. त्यामध्ये सभा, संमेल्लन, निषेध, मोर्चे आदी कामाची व्यवस्था करण्यासाठी वारंवार रहदारी नियंत्रक पोलीसांना उभे राहावे लागते. त्यामुळे अशा स्वरूपाचा कारवाईला दिरंगाई होत असते. यावर्षभरात सुमारे 4234 वाहतुकीचे नियम उल्लंघन केलेल्या वाहनांवर 5 लाख 74 हजार रूपयाचे दंड वसूल करण्यात आले आहे. शहरात रहदारी नियंत्रण करणार्‍या पोलीसांची लोकसंख्या लोकसंख्येनुसार अत्यंत तुटपुंजी असून फक्त 1400 नियंत्रक आहे. त्यांना पुरेसे संरक्षण नाही. पुण्यामध्ये सुमारे 34 लाख दुचाकी आहे. अनेकांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने अधिक वाहने रस्त्यावर लावली जातात. असे रहदारी विभागाकडून सांगण्यात आले.  याभागातील फूटपाथ ही बेवारस वाहनांवरोबर लघुउद्योजक, दुचाकी रिपेअर्स, टपरीधारक, हातगाडीवाले आदींनी अनाधिकृतपणे काबीज केले आहे. यासर्वांचा बंदोबस्त करण्याकरिता सतर्क पोलीस प्रशासन, मनपाचे अतिक्रमण विभाग यासर्वांची समन्वयता असल्याशिवाय चित्र बदलू शकणार नाही. 

Tags : Pune, Pune News, unauthorized, parking, situation, Bhavani Peth


  •