Tue, Apr 23, 2019 18:26होमपेज › Pune › पुणे: रांजणगाव गणपतीजवळ अपघात ३ ठार

पुणे: रांजणगाव गणपतीजवळ अपघात ३ ठार

Published On: Jul 16 2018 2:47PM | Last Updated: Jul 16 2018 2:47PMरांजणगाव गणपतीःवार्ताहर 

येथील हॉटेल गितांजली जवळ झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असल्याची माहिती रांजणगाव पोलीसांनी दिली.याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिरुरहून शिक्रापुरच्या दिशेने चाललेल्या दुचाकी स्वारांना विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या टेम्पोने चिरडल्याने तीन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोन जणांना शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान निधन झाले.

प्रवीण प्रभाकर जाधव (पाबळ ), विशाल राजाराम खांदवे ( हवेली), सुनील बबन शिंदे (थिटेवाडी, केंदूर ) हे तीन जण मृत झाले असुन गणेश अंकुश थिटे ( थिटेवाडी , केंदूर ) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यातील प्रवीण प्रभाकर जाधव ( पाबळ ) , सुनील बबन शिंदे (थिटेवाडी , केंदूर ) गणेश अंकुश थिटे ( थिटेवाडी , केंदूर ) हे आपल्या (एमएच.१२ जेटी ९०९०) या दुचाकीवरुन शिरुरहून शिक्रापुरच्या दिशेने जात होते. तर विशाल राजाराम खांदवे ( हवेली) हा ही या दुचाकी गाडीच्या मागे आपली गाडी हाकत होता. माञ विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या (एमएच १२ एसडी ३५९४) या टेम्पोने जोरदार धडक दिली असता हा अपघात घडला. हा अपघात घडल्या नंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आश्विनी कुटे करीत आहेत.