Wed, Nov 14, 2018 12:15होमपेज › Pune › टेम्पोने चिरडल्याने ज्येष्ठ महिला ठार

टेम्पोने चिरडल्याने ज्येष्ठ महिला ठार

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:13AM

बुकमार्क करा
चाकण :  भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणार्‍या ज्येष्ठ पादचारी महिलेस चिरडल्याची घटना चाकण (ता.  खेड) येथील मार्केटयार्डचे कमानीजवळील पुणे-नाशिक रस्त्यावर घडली.  याप्रकरणी भरधाव टेम्पोचालकावर चाकण पोलिसांत शनिवारी (दि.  6) गुन्हा दाखल केला.   सरूबाई पीतांबर पाटील (वय 75,  सध्या रा.  चाकण,  ता.  खेड,  मूळ रा.  निषाणे,  ता.  एरंडोल,  जि.  जळगाव) असे या अपघातात ठार झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.  या प्रकरणी नीलेश मोटाभाऊ बिलोरे (वय 29,  रा.  कळमदरी,  ता.  नांदगाव,  जि.  नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.