Fri, Feb 22, 2019 00:07होमपेज › Pune › सातारा : खंबाटकी घाटात टेम्पो दोनशे फूट खाली कोसळला : २ ठार

सातारा : खंबाटकी घाटात टेम्पो दोनशे फूट खाली कोसळला : २ ठार

Published On: Jul 10 2018 8:48AM | Last Updated: Jul 10 2018 8:48AMखंडाळा : वार्ताहर

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्याच्या उतारावर मंगळवारी सकाळी भिवंडी येथे वेफर्स घेऊन जाणारा ट्रक कठडा तोडून दोनशे फूट खाली कोसळला. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पहाटे पाच वाजता टेम्पो सावंतवाडी येथून भिवंडी येथे वेफर्ससाठी केळी घेऊन जात होता. या टेम्पोने खंबाटकी बोगदा ओलडल्यानंतर असणाऱ्या तीव्र उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याचा कठडा तोडून थेट दोनशे फूट खाली कोसळला. या भीषण अपघातात चालक आणि मालक गजानन लक्ष्मण राणे (वय ५० रा. सावंतवाडी) आणि हर्षद अच्युत गावडे (वय ३५) हे दोघे जागीच ठार झाले. तर स्वप्नील संतोष लोटीये (वय २५) हा जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.