Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Pune › पुण्यात उकाडा वाढणार

पुण्यात उकाडा वाढणार

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:21AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर व परिसरात येत्या 2-3 दिवसांत उकाड्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. उत्तरेकडून राज्यासह शहराच्या दिशेने येणारे अतिथंड वार्‍याच्या प्रवाहात खंड पडला असून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून अतिउष्ण वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर  आकाश निरभ्र बनले असून यामुळेच कमाल व किमान तापमानात वाढ होणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, शहरात शनिवारी सलग दुसर्‍या दिवशी किमान तापमानात वाढ नोंदविली गेली असून पारा 14.1 अंश सेल्सिअस एवढा नोंदविला गेला. पहाटेच्या वेळी गारेगार वातावरण शनिवारी नाहीसे झाले असून दिवसभर उकाडाही तीव्र बनला होता. यामुळे पुणेकर चांगलेच घामाघूम झाले होते. दरम्यान, शहर व परिसरात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून येत्या काही दिवसांत नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागण्याची शक्यता आहे.