Sat, Mar 23, 2019 18:50होमपेज › Pune › सरांमध्ये आणि माझ्यात

सरांमध्ये आणि माझ्यात

Published On: Sep 05 2018 10:09AM | Last Updated: Sep 05 2018 10:09AM इयत्ता पाचवीमध्ये असताना शेळके सरांची आणि माझी ओळख झाली. माझही आडनाव शेळके असल्यामुळे सरांमध्ये आणि माझ्यात "भावकी" च जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं. ते नेहमी लाडाने मला कायम भावकी म्हणून हाक मारायचे आणि अजूनही मारतात. त्यामुळे ह्या ओळखीचा फायदा मला शालेय शिक्षणात बराच झाला त्यातला त्यात मुलांना मी सरांच्या घरातला वाटायचो त्यामुळे अप्रत्यक्ष सरांच्या ओळखीचा मला फायदा होत गेला. विज्ञान आणि गणित सरांच्या आवडीचं पण त्यांना हिंदी हा विषय शिकवायला आवडत असे. वाचनावर आणि लिखाणावर सरांचं प्रभुत्व आहे, बऱ्याच निबंध स्पर्धेत सरांना अनेक बक्षीस मिळाली आहेत. 


सरांमुळे आम्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली ती आजतागायत कायम आहे. सरांच्या ओळखीने आम्हाला ताशावादक म्हणून एंट्री भेटली आणि सरांचं सहवास आम्हाला पुढची तीन वर्ष  लाभला. आमचं नातं एका मित्रासारखं निर्माण झालं. व्यायाम,वाचन या बद्दल सर हवी तेवढी माहिती देत अन या गोष्टी करायला आम्हाला पाठबळही देत.

१० वी नंतरही सरांसोबत आमचा संपर्क होत असे. बाहेरगावी शिक्षणाला असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी आम्ही मुलं सरांना हक्काने फोन करत असू आणि सर नेहमीच त्यांच्या एका वेगळ्या शैलीत प्रत्येक समस्यांचे निराकरण करत असत. मुलांसाठी हा माणूस म्हणजे दर शनिवारी  नवीन काही तरी उपक्रम करायचे. सरांकडे ग्रंथसंपदा पण पुष्कळ आहे आपण कधीही घरी जावं आणि हवं ते पुस्तक घेऊन यावं सर कधीच काही बोलणार नाही. वाढदिवसाला एखाद्या मित्रासारखं न चुकता फोन करणे,केक आणून वाढदिवस सेलिब्रेट करणं असो सर नेहमी आघाडीवर असत. त्यामुळे आमच्यातील हे गुरूशिष्याचं नातं हे चांगलंच बहरत गेलं. अजूनही सरांचं आणि आमचं फोन वर बोलणं चालूच असत, गावी गेलं की सरांची भेट आणि त्यांच्या घरी नाष्टा हा ठरलेला असतो. ढोलपथक, शाळेचं दिनविशेष, आणि तरुण असल्यामुळे शाळेतील इतरही जबाबदारी सर आवडीने स्वतःकडे घेतात. 


- निशांत शेळके

म्.ए.सो.विद्यालय बारामती