Wed, Jan 16, 2019 19:45होमपेज › Pune › कठडा तोडून ट्रक मुठा नदीत कोसळला, दोन ठार

कठडा तोडून ट्रक मुठा नदीत कोसळला, दोन ठार

Published On: Jul 21 2018 8:48AM | Last Updated: Jul 21 2018 8:48AMपुणे : प्रतिनिधी

गाडी चालविताना अंदाज न आल्याने पूलाचा कठडा तोडून ट्रक मुठा नदीच्या पात्रात कोसळ्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. कामगार पुतळा परिसरात घडलेल्या घटनेमध्ये दोघेजण ठार झाले आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे चार वाजता (एमएच ४२ टी ७३१२) रिकामा ट्रक पुणे स्टेशनच्या दिशेने निघाला होता. यावेळी अंदाज न आल्याने दहा चाकी ट्रक पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला. रात्रीच्या वेळी पुलावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. त्यामुळे ड्रायव्हरला अंदाज न आल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली आहे.