Mon, Nov 19, 2018 23:35होमपेज › Pune › पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Aug 09 2018 8:35AM | Last Updated: Aug 09 2018 8:35AMपुणे : प्रतिनिधी

पोलिस हवालदार उमेश राऊत यांनी स्वारगेट पोलिस लाईनमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने पोलिस लाईनमध्ये एकच खळबळ उडाली.

उमेश राऊत हे डेक्कन पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. ते स्वारगेट येथील पोलिस लाईनमध्ये बिल्डिंग नंबर सहामध्ये रहात होते. गुरुवारी सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.