Sun, May 26, 2019 21:47होमपेज › Pune › पुणे जिल्‍हा प्रशासनाने घेतली मंत्रालयातील आत्‍महत्यांची धास्‍ती

पुणे जिल्‍हा प्रशासनाने घेतली मंत्रालयातील आत्‍महत्यांची धास्‍ती

Published On: Mar 08 2018 3:40PM | Last Updated: Mar 08 2018 3:40PMपुणे : समीर सय्यद

शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून तर, हर्ष रावते यांनी इमारतींवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा पुण्याच्या जिल्हा प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता नवीन पाच मजली इमारतीला सुरक्षा जाळी बसिवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, धर्मा पाटील यांची पुनरावृत्ती करू, अशी काहींनी धमकीही दिली होती. त्याचीच धास्ती घेऊन प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

मंत्रालयात इमारतीवरून उडी मारून किंवा विष घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरली. या दोन्ही घटनांची राज्यभर चर्चा तर, झालीच पण, या घटनांना शासनाला जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे शासनाची सर्वत्र नाचक्की झाली. त्यानंतर प्रशासनाने पर्यायी मार्ग शोधण्यास सुरूवात केली. काही दिवसांमध्येच इमारतीच्या मध्यभागी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळ न घालवता दुसर्‍या घटना होऊ नये, यासाठी तातडीने याठिकाणी जाळ्या बसविण्यत आल्या. त्यानंतर राज्यातही आंदोलक व अन्यायग्रस्तांनी धर्मा पाटील व हर्षल रावते यांच्या सारखेच आम्हीही करू, अशा धमक्या दिल्या. त्यानंतर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली गेली. 

आता पुण्यात नुकतीच पाच मजली नवीन इमारत झाली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने आहेत. त्यामुळे पाचव्या मजल्यावर वयक्तिक आणि आणि सार्वजनिक महत्वाचे निर्णय घेतले जातात. आत्महत्या करण्याची धमकी देणारी काही प्रकरण घडल्याने प्रशासनाची भितीनेच चांगलीच धांदल उडाली. विरोधात निर्णय घेल्यास शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशानाने वेगाने जाळी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जाळी बसविली असून, चिनच्या संसदेमध्ये सर्वात प्रथम जाळी बसविण्यात आली आहे. पुण्यातही अशा घटना होऊन गालबोट लागू नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची पाच मजली नूतन इमारत सुमारे ७५ कोटी रुपये खर्चून राज्यातील पहिली पार्यावरणपूर्वक बांधण्यात आली. सध्या फर्निचरचे काम सुरु असून, मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन हर्ष रावते या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याची पुनरावृत्ती करु, अशी काहींनी धमकी दिल्याची माहिती एका अधिकार्‍यांने दिली. इमारतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थलांतरित झाल्यापासून खुल्या जागेत जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यातच मंत्रालयातील आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाळी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंधरा दिवसात काम सुरु होणार

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये जाळी बसविण्यात येणार आहे. दुसर्‍या आणि पाचव्या मजल्यावर ही लावण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. पुढील पंधरा दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्‍क यांनी सांगितले.

संभाव्य धोका टाळण्यासाठी निर्णय

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा मध्य भाग हा हवा खेळती राहावी यासाठी तळ मजल्यापर्यंत मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. कार्यालयामध्ये विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी असून, महिला आपल्या लहान मुलासह येतात, अशा वेळा नजरचुकीने मुले लोखंडी कठड्यातून खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.