Tue, Sep 25, 2018 04:41होमपेज › Pune › भांडणाच्या रागातून विद्यार्थ्यावर कोयत्याचा वार

भांडणाच्या रागातून विद्यार्थ्यावर कोयत्याचा वार

Published On: Mar 12 2018 12:33PM | Last Updated: Mar 12 2018 12:22PMपिंपरी : प्रतिनिधी 

पुर्वी झालेल्या भांडणातून चिंचवड येथील फतेचंद जैन महाविद्यायात घुसून एका विद्यार्थ्यावर दोन जणांनी वार केले. ही धक्कादायक घटना चिंचवड येथे सोमवारी (ता. १२) सकाळी घडली.

रुपेश राजेश गायकवाड (१७ रा. बळवंत कॉलनी, चिंचवड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश हा फतेचंद जैन महाविद्यायात अकरावीमध्ये शिकत होता. रूपेशला वर्गातील एका विद्यार्थ्याने कागदाचे बोळे मारले होते. यावरून त्याचे वर्गातील त्या विद्यार्थ्यांशी शुक्रवारी भांडणही झाले होते. सोमवारी रूपेश सकाळी साडेसात

वाजता महाविद्यालयात आला. वर्ग सुरू असताना उशिरा आलेल्या एका विद्यार्थ्याने रुपेशला प्रिन्सिपलने बोलवले असल्याचे सांगितले. रुपेश प्रिन्सीपलच्या केबिनकडे जात असताना दबा धरून बसलेल्या त्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले.