Fri, Jan 18, 2019 00:39होमपेज › Pune › पुण्यात ‘पद्मावत’ला विरोध, तरुणांनी वाहनांची हवा सोडली 

पुण्यात ‘पद्मावत’ला विरोध, तरुणांनी वाहनांची हवा सोडली 

Published On: Jan 24 2018 9:39AM | Last Updated: Jan 24 2018 9:39AMपुणे : प्रतिनिधी

आम्ही ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हणत पूणे- बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री हातात भगवे झेंडे घेऊन २० ते २५ जणांच्या टोळक्याने वाहने अडवून टायरमधील हवा सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी महेश भापकर (वय, 30, मुंबई) यांच्या तक्रारीवरून सिहंगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मध्यरात्री अचानक पुणे-बेंगलोर महामार्गावरील वडगाव ब्रिजवळ २० ते २५ जणांच्या टोळके हातात भगवे झेंडे घेऊन जमा झाले. त्यांनी आम्ही पद्माव चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अश्या मोठमोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यामुळे तेथे गोंधळ उडाला. त्यानंतर तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी  वाहने अडवत टायरमधील हवा सोडली.