'मराठा आरक्षणप्रश्‍नी घोळ घालण्याचा सरकारचा प्रयत्न' | पुढारी 
Fri, Aug 17, 2018 12:30होमपेज › Pune › 'मराठा आरक्षणप्रश्‍नी घोळ घालण्याचा सरकारचा प्रयत्न'

'मराठा आरक्षणप्रश्‍नी घोळ घालण्याचा सरकारचा प्रयत्न'

Published On: Feb 13 2018 6:44PM | Last Updated: Feb 13 2018 6:44PMपुणे : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाप्रश्‍नी सरकारद्वारे जाणीवपूर्वक घोळ घालण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणावरून सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. मात्र, सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे असल्याची टिका होत आहे. त्यात आज, थेट विरोधीपक्षनेत्यांनीच टिका केल्याने सरकारची कोंडी झाली आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, 'राज्य सरकारद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी सर्वेक्षणाचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित संस्थाना देण्यात आली असून, यामध्यमातून स्वतःचे घर भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य मागासवर्गिय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेची जबाबदारी मुंबई आणि कोकण विभागाचे काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, तर विदर्भाचे काम शारदा कन्सल्टन्सी सर्विसेस या संस्थेला देण्यात आले आहे. या दोन्हीही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर पुणे आणि नाशिक विभागातील काम देण्यासाठी संघाशी संबंधित संस्थाचा शोध सुरु आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे हे काम टाटा सोशल सायन्स आणि गोखले इन्स्ट्यिटूट सारख्या संस्थाना देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अशा क्षेत्रातील शून्य अनुभव असलेल्या संस्थाना काम देण्याबाबातचा सरकारने खुलासा करावा.'

सरकारमधील काही लोकांचे यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. संघाची आरक्षणाबाबतची भुमिका पाहता सरकार मराठा आरक्षणप्रश्‍नी घोळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी या वेळी केला.