होमपेज › Pune › अशी घडतीय पुणे मेट्रो 

अशी घडतीय पुणे मेट्रो 

Published On: Mar 22 2018 7:05PM | Last Updated: Mar 22 2018 6:57PMपुणे : ज्योती भालेराव-बनकर 

पुणेकरांमध्ये  सध्या मोठ्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय म्हणजे पुणे मेट्रो. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले होते. भुमीपूजनानंतर लगेचच महामेट्रोकडून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच १) मार्ग क्रमांक़ १ हा एकुण १६.५८९ किमीचा आणि वनाज ते रामवाडी (रिच २) मार्ग क्रमांक २ एकुण हा ११.५७० किमीचा असणार आहे. यातील मार्ग क्रमा़ंक १ वरील शिवाजी नगर ते स्वारगेट या ठिकाणी भुयारी मेट्रो असणार आहे. या दोन मार्गांचे काम सध्या जोमाने सुरू आहे.

मेट्रोच्या बांधकामासाठी ज्या ठिकाणी खोदकाम करायचे आहे, त्याठिकाणचे माती परिक्षण, पर्यावरण पुरक उपाययोजना म्हणून वृक्षारोपन, खोदकाम, खांब उभारणीसाठी पाया तयार करणे अशा एक ना अनेक कामांमधून पुणे मेट्रोचे काम आजच्या प्रगतीपर्यंत आले आहे. पुढारीच्या वाचकांसाठी छायाचित्रांच्या माध्यमातून पुणे मेट्रोच्या बांधकामाचा हा आढावा. 

२४ डीसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो बांधकामाचे भूमिपूजन 

Image may contain: one or more people and people standing

रामवाडी येथे भुमिपूजनानंतर २७ डिसेंबर रोजी माती परिक्षणासाठी सर्वेक्षणाची सुरुवात 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

महामेट्रोचे व्यव्यस्थापकीय संचालक यांच्या हस्ते वृक्षारोपन 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

नाशीक फाटा येथे खांबासाठीचा पाया उभारणीचे काम ११ ज़ुलै २०१७ रोजी सुरु करण्यात आले 

Image may contain: one or more people and outdoor

२३ ऑक्टोंबर २०१७ रोजी नाशिक फाटा येथील पहिल्या खांब उभारणीसाठी पियर कॅप बांधणी 

Image may contain: outdoor

२५ ऑक्टोंबर २०१७ रोजी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या रिच १ वरील वल्लभनगर येथे पहिला खांब उभा राहिला  

Image may contain: sky, cloud, outdoor and nature

२८ नोव्हेंबर २०१७ रोजी वनाज ते रामवाडी या रिच २ वरील पहिल्या खांबाच्या पायाची उभारणी करण्यात आली. 

Image may contain: one or more people

मेट्रो बांधकामावेळी अडथळा ठरणारे तीन वृक्षांचे स्थलांतर

Image may contain: one or more people and outdoor

१५ डिसेंबर २०१७ रोजी रिच १ च्या खराळवाडी येथे पुलासाठी पहिल्या व्हायाडक्ट सेगमेंटची उभारणी करण्यात आली. 

Image may contain: sky and outdoor

मेट्रोचे सेगमेंट अशा पद्धतीने वर उचलून त्यांची उभारणी करण्यात येते. 

Image may contain: sky, bridge and outdoor

‘रिच २’च्या पौड रस्त्यावरील पहिला खांब ११ मार्चला उभा राहिला

Image may contain: sky and outdoor

‘रिच २’ च्या पौड रस्त्यावरील मेट्रो पुलासाठीच्या पहिल्या व्हाया डकट सेगमेंटची उभारणी २० मार्चला पूर्ण 

Image may contain: sky and outdoor

 

Tags : Pune Municipal Corporation, Pune Metro Rail Project, Pune Metro photo