Wed, May 22, 2019 16:29होमपेज › Pune › पुणे : स्थायीचे अंदाजपत्रक वास्तववादी की फुगविलेले?

पुणे : स्थायीचे अंदाजपत्रक वास्तववादी की फुगविलेले?

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेचे उत्पन्न घटल्यामुळे आयुक्तांनी आपले अंदाजपत्रक कमी केले आहे. आता स्थायी समितीचे अंदाजपत्रक वास्तववादी असणार, की फुगविलेले असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ येत्या मंगळवारी  आपले अंदाजपत्रक मांडणार आहेत

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला 5 हजार 400 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. आयुक्तांच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकापेक्षा सुमारे 200 कोटींनी यावर्षी पालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक कमी केले. पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड मंदीचा फटका अंदाजपत्रकाला बसला.

पालिका आयुक्तांनीच अंदाजपत्रकाला कात्री लावल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आता 162 नगरसेवकांना ‘स’ यादीची तरतूद द्यावयाची आहे. सत्ताधार्‍यांच्या अपेक्षा वाढल्यामुळे 1 कोटीपासून 50 कोटींपर्यंत तरतूदीची मागणी केली असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. आता स्थायी समितीमध्ये असणार्‍या सभासदांनी सुध्दा भरघोस तरतूदीची मागणी केली आहे. भाजपला अंदाजपत्रकामध्ये पक्षाच्या योजना आणावयाच्या असल्यामुळे यासाठी सुध्दा पैसे लागणार आहेत. महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्चामध्ये वाढ होत आहे. गतवर्षी ‘स’ यादीमध्ये विरोधकांना डावलण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी न्यायालयात दाद मागितली होती. शहराचा समान विकास करावयाचा झाल्यास सर्व भागाला समान पाणी निधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

स्थायी समिती अध्यक्षांच्या तरतूदीकडे लक्ष

सभासदांना स यादीची तरतूद देण्याचा अधिकारस्थायी समिती अध्यक्षांचा आहे. त्यामुळे विरोधकांबरोबर सत्ताधार्‍यांनी भल्यामोठ्या तरतूदींचे पत्र स्थायी समिती अध्यक्षांना दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीसुधार 700 ते 800 कोटींची सहयादी आहे. स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर , सर्व गटनेते यांना किती तरतूद देण्यात येणार याची उत्सुकता आहे.