Thu, Nov 22, 2018 00:32होमपेज › Pune › सुसाट मोटारने चौघांना उडविले

सुसाट मोटारने चौघांना उडविले

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी

मोटारीला ठोकल्यावरून भांडण झाल्यानंतर घाईत मोटार घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना महाविद्यालयीन तरुणाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर सुसाट मोटारीने आठ वर्षांच्या चिमुरडीसह चौघांना उडविले. या अपघातात 5 वर्षाची मुलगी व  महिला गंभीर जखमी झाली असून 8 वर्षाची मुलगी आणि  टेम्पो चालक यांंना किरकोळ मार लागला आहे. महर्षीनगर भागात सायंकाळी वर्दळीच्या वेळी हा अपघात झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी मोटार चालक तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

साक्षी रमेश तिवारी (15) आणि रिना विनय पालरेचा (35, रा. महर्षीनगर) या दोघी गंभीर जखमी झाल्या. रिती सचिन पालरेचा (वय 8) आणि टेम्पो चालक राजेंद्र किसन रेणुसे (35) हे किरकोळ जखमी आहेत.पोलिसांनी मोटारचालक मोहित गजानन धूत (20, बाणेर, मूळ. अमरावती) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मोहित फोटोग्राफीचा कोर्स करत आहे. त्याचा मित्र महर्षीनगर भागात राहतो. त्याला भेटण्यासाठी  येताना मोटार भाड्याने घेतली होती. त्याने एका दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वाराने जाब विचारला, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. तेथे गर्दी जमली. मोहित घाबरला व तेथून निघून जाण्यासाठी मोटारीमध्ये बसला. 

या गडबडीत त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्याने प्रथम राजेंद्र रेणुसे यांना धडक दिली. त्यानंतर पायी निघालेल्या रिती व तिची काकु रिना पालरेचा यांना उडविले. तसेच, पुढे साक्षी यांना धडकून मोटार टेम्पोवर जाऊन आदळली.

 

Tags : pune, pune news, car, speedy car,