Mon, Apr 22, 2019 04:14होमपेज › Pune › पुण्यात मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या 

पुण्यात मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या 

Published On: Dec 06 2017 11:27AM | Last Updated: Dec 06 2017 11:27AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील मध्यवस्थीत मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रकाश क्षिरसागर (वय, ६०) आणि आशा क्षिरसागर (वय, ५५) असे हत्‍या झालेल्‍या पती पत्‍नीची नावे आहेत. तर, पराग क्षिरसागर असे हत्‍या केलेल्‍या संशयित मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे. 

आई-वडिलांची हत्‍या केल्यानंतर परागने स्वतः हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवार पेठ मधील पाठे हाईट्समध्ये घडलेली घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. परागने वडिलांवर काचाने वार करून त्‍यांचा खून केला. त्यांनतर आईचा गळा दोरीने आवळून खून केला. 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मध्यवस्तीत ही घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  खुनाचे कारण अद्यप समजू शकलेले नाही.