Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Pune › मुलानेच केला वडिलांचा खून

मुलानेच केला वडिलांचा खून

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 1:00AMशिरूर : प्रतिनिधी

वारंवार आईला वडिलांकडून होत असलेली मारहाण असह्य झाल्याने अखेर मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना कवठे येमाई (ता. शिरुर) येथे घडली. या घटनेत दादाभाऊ भगवंता वागदरे (वय 65, रा. वागदरेवस्ती, कवठे येमाई, ता. शिरुर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मीबाई दादाभाऊ वागदरे (वय 60) यांनी मुलाविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्या आधारे शिरुर पोलिसांनी सोमनाथ दादाभाऊ वागदरे (वय 25) याला ताब्यात घेतले आहे.

दादाभाऊ हे लक्ष्मीबाई यांना नेहमी मारहाण करायचे. त्यामुळे लक्ष्मीबाई वैतागून 3 महिन्यांपूर्वी इचकेवाडी येथे भावाकडे राहण्यास गेल्या होत्या. त्यानंतर लक्ष्मीबाई तीनच दिवसांपूर्वी परत नांदण्यासाठी घरी कवठेयेमाई येथे आल्या होत्या.बुधवारी (दि. 4) सकाळी लक्ष्मीबाई या चुलतदिराकडे खुरपणीसाठी गेल्या होत्या. सायंकाळी घरी आल्यानंतर पती दादाभाऊ यांनी खुरपणीच्या कारणावरुन लक्ष्मीबाई यांना मारहाण करत होते.

मुलगा सोमनाथ हा आईला मारहाण करत असल्याचे पाहून भांडणे सोडविण्यासाठी आला. त्यावेळी दादाभाऊ यांनी सोमनाथ याला शिवीगाळ केली. यावेळी सोमनाथने वडील दादाभाऊ यांना बांबूने मारहान केली. सतीश इचके व दादाभाऊ इचके यांनी सोमनाथ याला समजावून सांगितले व रामदास यांनी दादाभाऊ यांना घरासमोर आणून झोपवले ते व निघून गेले. त्यानंतर पुन्हा रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दादाभाऊ यांनी मुलगा सोमनाथ याला शिवीगाळ केली. राग अनावर न झाल्याने सोमनाथ याने वडील दादाभाऊ हे खाली पडलेले असताना मोठा दगड उचलून डोक्यात घातला व  त्यांचा खून केला.या प्रकरणी शिरुर पोलिसांनी सोमनाथ  वागदरे (वय 25) याला ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे हे करत आहेत.