Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Pune › उरूळीमध्ये ट्रकचा अपघात, ११ जखमी, ४ गंभीर

उरूळीमध्ये ट्रकचा अपघात, ११ जखमी, ४ गंभीर

Published On: Feb 20 2018 12:16PM | Last Updated: Feb 20 2018 12:11PMउरुळी कांचन : वार्ताहर

बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून मालवाहतूक ट्रकने पुणे -सोलापूर महामार्गावर जोरदार धडक दिल्‍याने या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. जखमींत चौघांची प्रकृती चिंताजनक असून दोघा लहान बालकांचा सामावेश आहे. पुणे -सोलापूर महामार्गावर मंगळवार दि. २० रोजी पहाटे साडेचार वाजता उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील खेडेकर मळा येथे हा अपघात झाला. अपघातास कारणीभूत ठरलेला वाळू वाहतूक करणारा ट्रक पसार झाला आहे.

मुंबईहून सोमवार दि.१९ रात्री हैद्राबादकडे जुने टायर घेऊन वाहतूक करणाऱ्या मालवाहतुक ट्रकला (केए ५६ २३८१) पुणे -सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत खेडेकरमळावस्तीलगत वाळूचा ट्रक महामार्गावर अचानक आल्याने दोन ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये मालवाहतूक ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकच्या दर्शनी भागातील  चालक आसिफ शेख , क्लिनर महंमद युसुब ( दोघेही रा. बसवकल्याण ,कर्णाटक ), आरू राजू मखरे( वय-३) व रूही राजू मखरे (वय-२) ( रा.राजवाडा ,इंदापूर ) हे गंभीर जखमी झाले आहे. तर प्रतिभा राजू मखरे (वय-३०,रा.राजवाडा, इंदापूर ), पिराजी लक्ष्मण मिसाळ (वय-४०), स्वामी भागवत मिसाळ (वय २८ रा. राजवाडा, इंदापूर ), सुमन चंद्रगुप्त गायकवाड व हरिवंदा प्रविण गायकवाड (वय ५० हाळणी, बसवकल्याण, कर्नाटक), पार्वती बाबुराव गायकवाड (रा. राजवाडा, इंदापूर ) व संजयकुमार रामचंद्र रंगारे (रा. बसवकल्याण , कर्नाटक ) असे अपघातात जखमी झाले आहे.

अपघाता होताच परिसरातील नागरिकांसह कस्तुरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बापूसाहेब मेमाणे , मिलिंद मेमाणे , किशोर मेमाणे , वैजनाथ कदम यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातग्रस्तांना तात्काळ लोणीकाळभोर , येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान दोघा बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईहून हे सर्व प्रवासी इंदापूर व बसवकल्याण प्रवासासाठी ट्रकमध्ये बसून प्रवासी होते.