Tue, May 21, 2019 00:03होमपेज › Pune › शिवसेना बारामती जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन

शिवसेना बारामती जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन

Published On: Feb 25 2018 11:34PM | Last Updated: Feb 25 2018 11:34PMपिंपरी : प्रतिनिधी

शिवसेनेचे बारामती जिल्हाप्रमुख व पिंपरी-चिंचवडचे माजी शहरप्रमुख बाबासाहेब धुमाळ (वय ६५) यांचे आज रविवार दि. २५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, ४ मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

बाबासाहेब धुमाळ हे सुमारे ३५ वर्षापासून शिवसेनेत निष्ठेने काम करत होते. पिंपरी चिंचवड शिवेसेनेचे शहरप्रमुख म्हणून त्यांनी ११ वर्षे जबाबदारी सांभाळली. सन २०१२ ते २०१७ या कार्यकालात ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्विकृत नगरसेवक होते. तसेच शिवसेनेचे बारामती जिल्हाप्रमुख म्हणून गेली १५ वर्षे ते काम पाहत होते. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट व पेट्रोल डिझेल असोसिएशनचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे.