Tue, Nov 20, 2018 16:59होमपेज › Pune › पुणेः ५१ फुटी स्वराज्य गुढीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

पुणेः ५१ फुटी स्वराज्य गुढीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

Published On: Jun 06 2018 10:49AM | Last Updated: Jun 06 2018 10:50AMपुणे : प्रतिनिधी

शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह 351 ढोल ताशांचा दणदणातात स्वराज्यगुढी दिमाखात उभी करण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे ३४५  वा शिवराज्याभिषेक दिन, स्वराज्य दिन, शिवशक प्रारंभ दिन, स्वराज्य नववर्ष दिनी शनिवारवाडयाच्या प्रांगणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

शिवगर्जना, सह्याद्रीगर्जना, जय शिवराय, आम्ही नुमवीय, नादब्रह्म ट्रस्ट ,रुद्र्रगर्जना, गुरुजी, शिवनेरी, समाधान ही पुण्यातील नामांकीत ढोलताशा पथके वादनात सहभागी झाले होते. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाडातर्फे शिवकालीन मदार्नी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. सोहळ्याचे हे ६ वे वर्ष असून अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्याकडून सादर झाली.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ह.भ.प धर्मराज हांडे महाराज, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले, फर्जंद चित्रपटातील कलाकार, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या सरदार, सुभेदार, मावळ्यांचे वंशज उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ ढमढेरे, सचिन पायगुडे, अनिल पवार, समीर जाधवराव, महेश मालुसरे, किरण देसाई, रवींद्र कंक, शंकर कडू, गिरीश गायकवाड, दिपक घुले, किरण कंक, निलेश जेधे, दिग्वीजय जेधे, गोपी पवार, मंदार मते, दिपक बांदल, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.