Tue, Nov 20, 2018 05:27होमपेज › Pune › पुण्यात ६५ स्वराज्य रथासह शिवजयंती उत्साहात (व्‍हिडिओ)

पुण्यात ६५ स्वराज्य रथासह शिवजयंती उत्साहात (व्‍हिडिओ)

Published On: Feb 19 2018 10:11AM | Last Updated: Feb 19 2018 10:11AMपुणे : प्रतिनिधी

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळयाने भव्यदिव्य मिरवणुकीने सुरूवात करण्यात आली.

मिरवणुकीचे उद्घाटन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर मुक्ताताई टिळक, आमदार शशिकांत शिंदे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आदींच्या हस्ते करण्यात आला.

 सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ६५ स्वराज्य रथ आणि असंख्य स्वराज्यबांधवांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.