Tue, Jul 16, 2019 09:45होमपेज › Pune › शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक कोंढरे यांचे निधन 

शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक कोंढरे यांचे निधन 

Published On: Jun 05 2018 11:51PM | Last Updated: Jun 05 2018 11:51PMपुणे :  प्रतिनिधी

राष्ट्रीय कबड्डीपटू, शिवछत्रपती पारितोषिक विजेते, भारताबाहेर जपान बांगलादेश येथे कबड्डी नेणारे भारतीय संघाचे नेतृत्व करणारे, महाराष्ट्राचे संघात सलग १६ वर्षे राष्ट्रीय पातळीवर खेळणारे अशोक विठ्ठलराव कोंढरे यांचे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. 

वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत नवोदित खेळाडूंना घडविणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे ६ जून रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत होईल. 

त्यांच्या मागे दोन मुले, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय खेळाडू सचिन कोंढरे, खेळाडू विशाल कोंढरे यांचे वडील तसेच नगरसेविका आरती कोंढरे यांचे सासरे होते. त्यांच्यावर सकाळी 11 वाजता वॆकुंठ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.