निमगाव दावडी : वार्ताहर
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी गावामध्ये गुरूवारी मध्यरात्री १ते ३ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांचा टोळीने धुमाकूळ घातला शेलपिंपळगाव रोडवरील सात दुकानांची शटर फोडून दुकानांची नासधूस करून दुकानातील अंदाजे पन्न्नास हजार रूपये, महत्वाचे कागदपत्रे, दुकानातील साहित्य आणि एक नवीन दुचाकी चोरीला गेली आहे.
गावात याबाबतची समजल्यावर ग्रामस्थांनी पोलिस पाटील यांच्याशी संपर्क केला व पोलिस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन खेड पोलिस स्टेशनला कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.