Wed, Nov 21, 2018 09:12होमपेज › Pune › शरद पवार-नितीन गडकरी यांच्यात गुप्तगू

शरद पवार-नितीन गडकरी यांच्यात गुप्तगू

Published On: Jun 01 2018 5:14PM | Last Updated: Jun 01 2018 5:14PMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यात शुक्रवारी दुपारी दोन वाजता हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीयटमध्ये चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेला धूळ चारत विजय संपादित केला. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला मित्र पक्षांची गरज उरली नसल्याचे सांगत भविष्यात युती न करण्याचे स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे पवार आणि गडकरी यांच्या गुप्त भेटीला महत्त्व आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चर्चा होत असल्याने दोन्ही भिन्न विचारी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या भेटीचा अर्थ काढण्यास राजकीय विश्लेषकानी सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राजकीय  उलथापालथ पाहायला मिळण्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.