Wed, Sep 19, 2018 18:15



होमपेज › Pune › येरवडा कारागृहात रंगली बहारदार गीतांची मैफील(व्हिडिओ)

येरवडा कारागृहात रंगली बहारदार गीतांची मैफील(व्हिडिओ)

Published On: Jan 17 2018 10:37PM | Last Updated: Jan 17 2018 10:37PM

बुकमार्क करा




पुणे : प्रतिनिधी

मोरया, मोरया गणपती बाप्पा मोरया..., सुर निरागस हो..., गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही..., मन उधाण वार्‍याचे..., हर घडी बदल रही है धुप जिंदगी..., मैंने जिसे अभी अभी देखा है, कौन है वो अनजानी..., मेरे मन ये बता दे तू, कही और चला है तू, मितवा...यांसारख्या बहारदार गीतांनी येरवडा कारागृहात सजली शंकर महादेवन यांची सुमधुर गीतांची मैफल.

येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि भोई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा पथ  या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गायक शंकर महादेवन यांनी एकापेक्षा एक सरस सादर केलेल्या सुमधुर गीतांनी बंदी बांधव मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सादरीकरणाला कैद्यांनी टाळ्याच्या कडकडाटाबरोबरच शब्द स्वरांना देखील साथ दिली. यावेळी अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महासंचालक विठ्ठल जाधव, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे,  सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम, कारागृह अधीक्षक यु.टी.पवार, इकबाल दरबार, आवेज दरबार, जमिर दरबार व अन्य उपस्थित होते. 

सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हम पे डालो, सबसे आगे होगे हिंदूस्तानी..., तारे जमिन पर चित्रपटातील मेरी मॉ..., यासांरखी एकापेक्षा एक सरस गाजलेली गीते सादर करत शंकर महादेवन यांनी कैद्यांसह मान्यवरांची मने जिंकली. तसेच इकबाल दरबार ऑर्केस्ट्राच्या कलाकारांनीही सुमधुर गीते पेश केली. कार्यक्रमादरम्यान कलाकारांसह कारागृहातील कैद्यांसह पोलिस कर्मचार्‍यांनी सुध्दा विविध गाणी सादर केली.