Mon, Jul 22, 2019 03:22होमपेज › Pune › आजाराला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

आजाराला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील सिहंगड परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने आजाराला कंटाळून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

विजय शंकर कर्णीक (67, रा.मधुकर सोसायटीजवळ, धायरी) असे आत्महत्या केलेल्या नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी सिहंगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

कर्णीक यांना दम्याच्या (टीबी) आजार असून, ते गेल्या काही वर्षांपासून सतत आजारी असतात. मात्र, काही दिवसांपासून त्यांना खूप त्रास होत होता. ते कायम ऑक्सिजनवर होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवारी पहाटे राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सिहंगड पोलिस अधिक तपास करत आहेत.