Thu, Sep 20, 2018 12:32



होमपेज › Pune › 'सेल्फी विथ खड्डा' काढा आणि मिळवा 100 रूपये

'सेल्फी विथ खड्डा' काढा आणि मिळवा 100 रूपये

Published On: Jul 17 2018 8:19PM | Last Updated: Jul 17 2018 8:19PM



'सेल्फी विथ खड्डा' काढा आणि मिळवा 100 रूपये
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागात रस्त्यांवर लाखोंच्या संख्येने खड्डे पडले आहेत. मात्र, पालिका प्रशासन 4 हजार खड्डे पडल्याची खोटी आकडेवारी देत आहे. पालिका प्रशासनाला उघडे पाडण्यासाठी नागरिकांकडून शहरातील खड्ड्याचे छायाचित्र मागविले आहेत. प्रत्येक छायाचित्रासह 100 रूपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि.17) दिली. 

पालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचा दावा केला होता. मात्र, जोरदार पावसामुळे शहरातील सर्वच भागांतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे करदात्या नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारयुक्त कारभाारातून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविले जात असून, त्यामुळे नागरिकांच्या जिविताशी खेळण्याचे काम सुरू आहे, असा आरोप साने यांनी केला. सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासनाचा त्यांनी निषेध केला आहे. 

शहरातील खड्ड्यांची प्रत्यक्ष आकडेवारी पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांना कळावी म्हरून ‘सेल्फी विथ खड्डा’ उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस राबवित आहे. छायाचित्र पाठविणार्‍यास 100 रूपये दिले जाणार आहेत. तसेच, फेसबुक पेजला टॅग करावे. हे छायाचित्र 9822199599 किंवा 9970037513 या व्हॅट्स अप क्रमांकावर पाठवावेत, असा आवाहन साने यांनी केले आहे. या छायाचित्रांमुळे भाजप पदाधिकारी व प्रशासनाला जाग येऊन शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हे छायाचित्र महापौर, आयुक्त व तिन्ही आमदारांना टॅग केले जाणार आहेत.