होमपेज › Pune › पुणे : बावधनमध्ये सुरक्षा रक्षकाचा खून 

पुणे : बावधनमध्ये सुरक्षा रक्षकाचा खून 

Published On: Jun 12 2018 10:22AM | Last Updated: Jun 12 2018 10:22AMवाकड : वार्ताहर 

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बावधन येथे एका सुरक्षा रक्षकाचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल ( ६३, रा.वारजे माळवाडी, पुणे) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. 

जीवनलाल वारजे चांदणीचौक नजीकच्या केसीपीएल कंपनीत कामास आहे. रात्री तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. सकाळी त्याचा खून झाल्याचे एका कामगाराने पोलिसांना कळवले. हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  हलवण्यात आला आहे.