Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Pune › अखेर लाचखोर शिल्पा मेनन आणि महादेव सारूख निलंबीत

अखेर लाचखोर शिल्पा मेनन आणि महादेव सारूख निलंबीत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायदा (आरटीई )अंतर्गत विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदानाचे बील मंजूर करून रक्कम अदा करण्यासाठी ५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षण अधीक्षक शिल्पा मेनन आणि लिपीक महादेव सारूख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.

शनिवारी रात्री उशिरा दोघांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


  •