Mon, Aug 19, 2019 05:41होमपेज › Pune › सुदैवाने बिल्डर शहांचा मुलगा बचावला

सुदैवाने बिल्डर शहांचा मुलगा बचावला

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

हल्लेखोरांनी शिवीगाळ करत शनिवारी मध्यरात्री देवेनभाई शहा यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या वेळी मुलगा अतित याने हल्लेखोरांना अडविले; परंतु, त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या; परंतु सुदैवाने त्या दोन्हीवेळा झाडलेल्या गोळ्या मिस-फायर झाल्या. त्यामुळे अतित बचावला. हल्लेखोर पळून जाताना अतित त्यांच्या मागे धावला. त्या वेळी पाठीमागे येऊ नको, असे म्हणत त्याला धमकावले व हल्लेखोर पसार झाले. 

दरम्यान,  शहा कुटुंबीय बाणेर रोडवरील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवण केले व ते रात्री पावणेअकरा वाजता घरी आले. शहा त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरात गप्पा मारत बसले. त्याच वेळी त्याचवेळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे दुचाकीवर दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला बोलविण्यास सांगितले. त्याने देवेनभाई शहा यांच्याकडे जाऊन दोन व्यक्ती आल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि ते खाली आले. देवेनभाई शहा खाली येताच हल्लेखोरांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी देवेनभाई शहा यांनी आपण बसून बोलू, असे सांगितले. त्यावेळी  दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या जवळील पिस्तूलातून पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या शहा यांना लागल्या होत्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत तर, दोन गोळ्या कमरेजवळ लागल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु ते यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाच गोळ्यांपैकी दोन गोळ्या मिस फायर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी शोध घेऊनही हल्लेखोरांचा थांगपत्ता लागला नाही.

काही जमिनींचे वाद न्यायालयात सुरू 
देवेनभाई शहा हे कुटुंबासोबत डेक्कन परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून कमला नेहरू पार्क येथे अंबिका ग्रुप नावाने ऑफिस आहे. त्यांचा मुलगा अतित व ते हा व्यवसाय पाहतात. दरम्यान शहा 2004 पासून पुण्यात व्यवसाय करत आहेत. यापूर्वी ते मुंबईत व्यवसाय करत होते. त्यांनी पौड, शिरवळ, धायरी, कोंढवा भागातील जमीन खरेदी व विक्री केलेली आहे. त्यातील काही जमिनींचे वाद न्यायालयात सुरू आहेत. शहा यांचा मुंबईत व्यवसाय असल्याने तेथील माहितीही पोलिस घेत आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप ठोस काही मिळालेले नाही.